*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील शिवसेना शाखेने नुकतेच अमरावती नदी पुलावर पडलेल्या धोकेदायक खड्ड्यांच्या बाबतीत व बायपास उड्डाणपुलावर बसविण्यात येत असलेल्या निकुर्ष्ट गतिरोधक, पथदिवे बाबत निवेदन दिले असुन तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी जिल्हा प्रशासन व स्थानिक नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे,असे शिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश भाऊ सोनार यांनी *जनमतच्या* टीमला प्रत्यक्ष भेटीतुन सांगितले.
याबाबत मा.कार्यकारी अभियंता सो, रोहयो धुळे, मा.मुख्याधिकारी सो, दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका यांना दिलेल्या निवेदनाचा विषय असा की, शहरातील वरवाडे भाग व स्टेशन भागला जोडणाऱ्या अमरावती नदी पुलावर धोकेदायक खड्डे पडलेले आहेत. ह्या रस्त्यावरून दैनंदिन हजारो नागरिक पायी व मोटरसायकलने वापर करत असतात. तसेच चारचाकी व मोठे अवजड दहा चक्के वाहन ह्या पुलावरून धुळे,शिरपुरकडे माल ने-आण करण्यासाठी वाहतुक करतात व अशा परिस्थितीत पुलाची भार क्षमता कमी झालेली आहे. म्हणून भविष्यात मोठी दुर्घटना किंवा एखाद्याच्या जीवाशी घटना येवू शकते. म्हणून तात्काळ आपण ह्या पुलाची दुरुस्ती करावी.तसेच बायपास उड्डाण पुलावर जे गतिरोधक व पथदिवे बसविण्याचे काम चालू आहे. ते फक्त थातुर-मातुर काम आहे. जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून गतिरोधक व पथदिवे चांगल्या व उच्च प्रतीचे एकचवेळा बसवावे. प्रशासनाने आणखी कोणी निष्पाप जीवाचा बळी जाईल, याची वाट पाहू नये व दोघी कामांना लवकरात लवकर गती देवून पुर्ण करावे,असे निवेदनावर उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकासेठ,राज टोले, युवासेना तालुका प्रमुख आकाश कोळी,सुहास साठे आदी दोंडाईचा शहर शिवसेना कार्यकर्त्यांनी सह्या करत म्हटले आहे.



0 Comments