Header Ads Widget

परंपरेला साजेसे अधिवेशन डिसेंबरमध्ये व्हावे असा प्रयत्न मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे सुतोवाच





धुळे- ‘‘गेल्या दहा-बारा वर्षात रोहा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, शेगांव, नांदेड येथे झालेली अधिवेशनं ही पत्रकार चळवळीस बळकटी देणारी ठरली असून मराठी पत्रकार परिषदेच्या परंपरेला साजेसेच अधिवेशन यंदा डिसेंबर मध्ये व्हावे असा प्रयत्न आहे.  ‘आमच्या जिल्ह्यात अधिवेशन घ्या’ अशी दोन-तीन जिल्ह्यांची मागणी असून लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. साधारणत: आतापर्यंत ज्या भागात अधिवेशन झाले नाही तिकडे अधिवेशन व्हावे असा प्रयत्न असेल’’ असे सुतोवाच अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी नुकतेच केले.

राजेंद्र काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने 82 वर्षांची परंपरा असलेल्या अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे 41वे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीरित्या शेगांव येथे पार पडले त्याला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली. शेगांव संस्थानचे कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील  आणि संस्थानच्या सहकाऱ्यांमुळे जेथे 20 ते 25 लाख रुपये खर्च अपेक्षित होता ते अधिवेशन अवघ्या पाच लाख रुपयात तेही हा निधी थेट त्या-त्या सहकाऱ्यांकडून संस्थानला देणगी स्वरुपात जमा झाला होता. त्यात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने शेगांव या संत नगरीत दोन हजार पत्रकारांची मांदीयाळी जमवून पत्रकारांना शेगाव संस्थान जवळून बघण्याची अनुभूती आली.  पत्रकारांनी अगदी सहपरिवार ‘आनंदसागर’ बघुन अनुभूती घेतली. प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित न राहता अधिवेशनासाठी ज्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले ते संस्थानचे कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची आठवण म्हणून राजेंद्र काळे यांनी त्यांच्या स्मृतिला उजाळा देत असतांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त  एस.एम. देशमुख म्हणाले, शेगावचे अधिवेशन ऐतिहासिक ठरले. कुठलाही वाद न होता बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि राजेंद्र काळे यांच्या टीमने घेतलेले परिश्रम मी विसरु शकत नाही. दोन हजार पत्रकारांनी संस्थानला अपेक्षित शिस्त पाळली आणि अनेक चांगल्या गोष्टींची शेगावात अनुभूती आली. नुकतेच निधन झालेले व अधिवेशनासाठी महत्वाचे योगदान असलेले कर्मयोगी शिवशंकर भाऊंची मला भेट घेता आली नाही अशी खंत व्यक्त केली.  शिवशंकरभाऊंच्या प्रती एस.एम. देशमुख यांनी परिषदेच्या वतीने ऋण व्यक्त करीत भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.

*****


Post a Comment

0 Comments