Header Ads Widget

*पंचवीस-तीस फोटोग्राफरांनी एकत्र येत,वेगळ्या पद्धतीने साजरा केला जागतिक फोटोग्राफर दिवस...*

*मालपुर ता.शिदंखेडा येथे जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त करोना योद्धाचा सत्कार...*



*जनमत-*

*दोंडाईचा-* मालपुर ता.शिंदखेडा येथे दिनांक १९ आँगस्ट गुरूवार रोजी जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त पंचवीस-तीस फोटोग्राफरांनी एकत्र येत मालपुर गावातील करोना काळात निडर सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम हा मालपुर येथील ग्रामीण रूग्णालयात दुपारी १२.३० वाजता घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री महावीरसिंह रावल, लोकनियुक्त सरपंच मछिच्द्र शिंदे, पोलीस पाटील बापू धनगर आदी उपस्थित होते.

यावेळी करोना योद्धा म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री महावीससिंह रावल,पोलीस पाटील बापू धनगर, डॉ. हितेद्र पाटील, डॉ. राजपुत मँडम,इरफान पठाण, आशा वर्कर, रूग्ण वाहिका १०२चे चालक पंकज माळी आदींचा सत्कार फोटोग्राफर बांधवांनी केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फोटोग्राफर युनीयनचे अध्यक्ष श्री नितीन सावंत,उपाध्यक्ष श्री शाम रामोळे, सचीन रविंद्र चौधरी,खजिनदार श्री पंकज पाटील, मनोज देवरे, अंकुश पाटील, सागर सोनार, ईश्वर अग्रवाल, दगेसिंग गिरासे, ईश्वर चौधरी,मनोज मालचे, गजानन शंकपाळ,हिमंत निकम,अनिल शिरसाट, अनिल पाटील आदींनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments