Header Ads Widget

विधायक : बहिणीच्या स्मरणार्थ भावांची गुरूकुलास अनोखी शैक्षणिक भेट ;स्व.सारिका लोहार स्मृतिप्रीत्यर्थ रक्षाबंधनाचा उपक्रम




झोडगे: बहिण भावाच्या नात्याचे अनेक कंगोरे सांगितले जातात. या नात्यांची समृद्धता रक्षाबंधन, भाऊबीजेसारख्या सणातून दृढ होते. खरतर सण साजरा करताना याच दिवशी कोणाची बहिण हिरावली जाणे.हा दुखावियोग स्मरतांना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका असलेल्या कै. सारिका लोहार बहिणीच्या स्मरणार्थ दमोताई वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनास १५ फोल्डींग चेअर, शैक्षणिक साहित्य, खाऊ या स्वरूपात भेट देऊन या भावंडांनी अनोखे रक्षाबंधन कृतीशील झाले. 
चांदवड तालुक्यात कार्यरत असलेल्या शिक्षिका यांचा तीन वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी आकस्मिक मृत्यू झाला. 
याच दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षिका असलेल्या बहिणीच्या स्मृतींना उजाळा दिला. 
शहरातील प्रसिद्ध  बांधकाम व्यावसायिक रामचंद्र जाधव यांनी व त्यांचे मुले धनंजय जाधव, अरूण जाधव, हेमचंद्र जाधव यांनी आपल्या बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ दमोताई वारकरी गुरूकुलातील विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनास फोल्डींग चेअर, शैक्षणिक साहित्य, खाऊ या स्वरूपात भेट देऊन अनोखे रक्षाबंधन झाले. सर्व साधन सामुग्री गुरूकुलाचे संचालक प्रकाश महाराज गांगुर्डे यांच्याकडे जाधव कुटुंबियांनी सोपवली. 
यावेळी किशोर जाधव,पुष्पलता खैरनार, प्रमिला सैंदाणे, रामकृष्ण सैंदाणे, रघुवीर शार्दूल, नामदेव सुर्यवंशी, संजय जाधव, कैलास शार्दूल, माजी पंचायत समिती सदस्य अशोक शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. हिरालाल नरवाडे, केशव सुर्यवंशी, रविंद्र भोईटे, संदीप दिघे आदींसह जाधव कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments