शिंदखेडा विकास संघर्ष समितीच्या वतीने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे सर्व सुविधानियुक्त उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना जन आशीर्वाद यात्रा निमित्त चिमठाणे ता. शिंदखेडा येथे आले असतांना निवेदन देण्यात आले.
शहर व परिसरातील सुमारें 45 गावांतील लोकसंख्या एक लाखाच्या पलीकडे आहे. परंतु आरोग्याच्या कमी सुविधा, डॉक्टरर्स-कर्मचारी यांची कमतरता, x ray मशीन चालक नसणे, ऑक्सिजन नसने इ. बऱ्याच आरोग्याच्या सुविधा नसणे व वेळेवर उपलब्ध न होणे. यामुळे येथील नागरिकांना धुळे, शिरपूर वा इतर मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागते. कोरोना कालखंडात तर येथील नागरिकांना खूपच त्रास व हाल सहन करावा लागला.अश्या अनेक समस्या चे घर असलेल्या शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर जर उपजिल्हा रुग्णालयात झाले तर सुविधा अधिक मिळतील. यासाठी शिंदखेडा विकास संघर्ष समिती मागील 2 वर्षांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री, धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना याविषयावर निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधत आहे.
यासाठी शिंदखेडा विकास संघर्ष समिती च्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा.डॉ भारतीताई पवार, माजी मंत्री आमदार मा. जयकुमार भाऊ रावळ व माजी मंत्री आमदार मा. गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन देण्यात आले व या विषयासाठी त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा करण्याची मागणी केली.
यापूर्वी ही याविषयाची जनभावना शासना पावेतो पोहचावी यासाठी समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम ही सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री यांना निवेदन देऊन विषयाचे गांभीर्य समितीचे सदस्य अमोल भगवान मराठे, प्रा. अनिल माळी, प्रा. उमेश चौधरी, प्रविण माळी व योगेश माळी इ.नी समजून सांगितले.

0 Comments