अमळनेर तालुका धनगर समाज यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 226 पुण्यतिथी उत्साहाने साजरी करण्यात आली अमळनेर तालुका धनगर समाज व राजे मल्हार राव होळकर प्रतिष्ठान तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 226 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमदार अनिल दादा पाटील ,माजी आमदार आबासो बी एस पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाला मान्यवर खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी माननीय जितेंद्र जैन , योगेश मुंदडा ,प्रदीप अग्रवाल व प्रा अशोक पवार,श्री संदीप घोरपडे सर ,एल.टी.पाटील, एस.एम.पाटील,अलिम्ं मुजावर आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला समाजातील गुणी जणांचा सत्कार माननीय आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी आमदार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments