Header Ads Widget

*साक्रीत मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा **



साक्री---मनूवादी विचार धारेवर प्रहार करत स्री सन्मानाचा विचार समाजात रूजवणा-या आणी विविध कक्षांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांच्या भल्याचा नव विचार  कृतीत आणणा-या मराठा सेवा संघाची विचार धारा अंगिकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. डी.एल् तोरवणे यांनी केले.
     साक्री तालुका  मराठा सेवा संघ व  संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने,येथील सी.गो.पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात  गेल्या 1 सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या 31व्या वर्धापन दिना निमित्त,प्रतिमा पुजन,वृक्षारोपण व व्याख्यान अशा तिहेरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डाॅ. डी.एल्.तोरवणे बोलत होते. या प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून साक्री चे गटशिक्षणाधिकारी शिवानंद निर्मल साहेब,साक्री  पोलिस ठाण्याचे पी.आय .दिनेश अहिरे,शि.वि.अधिकारी व्ही. बी.पवार,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती भारती भदाणे,म.से.संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक नांद्रे,तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें,सचिव डाॅ. सचिन नांद्रे,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शितल सनेर,सी.गो.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र आहिरे,मुख्याध्यापक पी.झेड्. कुवर, विजय भोसले, शिक्षक संघटनाध्यक्ष अनिल अहिरे,विकास सोनवणे  आदि उपस्थित होते. 
     या प्रसंगी डाॅ. तोरवणे पुढे म्हणाले की, मराठा सेवा संघाला समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यात व पुरोगामी तथा विज्ञानवादी विचारांचा वारसा सांगण्यात चांगले यश मिळाले आहे , हया बाबत समाधान व्यक्त करतांनाच शासन स्तरावर जे कुणी अधिकारी काम करत असतील त्यांनी आपल्याकडे अडचणी घेवून येणा-या गरजवंतांना प्रामाणिकपणे मदत करण्याच्या प्रगल्भ विचारांचे सबलीकरण सर्वत्र झाले तर ख-या अर्थाने समाजाचे भले होईल असे नमूद करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
   प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी निर्मल साहेब म्हणाले की,समाजाच्या भल्यासाठी प्रत्येकाने सामुहिक व एकजुटीने प्रयत्न करतांना आधी दुस-याचे भले होवू देत, मग माझे भले होईल या विचाराने काम करणं व यासाठी  एकसंघता टीकविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन  केले.
    जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती भारती भदाणे यांच्या प्रारंभीच्या जिजाऊ वंदनेने व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राजमाता जिजाऊ व छ.शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. आपल्या  प्रास्ताविके म. सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें यांनी सेवा संघाच्या कार्याचा लेखा-जोखा मांडून वर्धापनदिनाचे उद्दीष्ट स्पष्ट केले. या प्रसंगी शिवमती भारती भदाणे यांनीही जिजाऊ ब्रिगेडचे काम यापुढेही जोमाने सूरू ठेवण्याची ग्वाही दिली. प्राचार्य डाॅ. राजेंद्र आहिरे यांनी तालुक्यातील सेवा संघाच्या कामाचे कौतुक व  उपस्थितांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
   सचिव डाॅ.सचिन नांद्रे यांनी सुत्रसंचालन केलेल्या व डाॅ.डी.एस्. चव्हाण यांच्या आभार प्रदर्शना नंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून वर्धापनदिन सोहळ्याची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म.से.संघ व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments