मांडळ ता. अमळनेर - अमळनेर तालुक्यातील मांडळ (मुडी) ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच संपन्न होऊन या सभेत मांडळ ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गावातील तरुण कार्यकर्ते राजेंद्र अण्णा धनगर पैलवान यांची एकमताने निवड करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा विषय चर्चेत आल्यानंतर उपस्थित ग्रामस्थ सदस्यांनी एकमताने त्यांचे नाव सूचविले व सभेने त्यास मान्यता दिली.
नुतन तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर हे पंचक्रोशीत ‘राजु पहिलवान’ म्हणून परिचित आहेत. ते उत्कृष्ट कुस्तीगिर असून 52 किलो वजन गटात त्यांनी शिंदखेडा तालुक्यात विजय मिळविला होता. पंचक्रोशीत गोरगरीबांच्या मदतीसाठी संकटकाळी धावून जाणारे युवक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे वडील अण्णा पैलवान धनगर हे देखील ख्यातनाम कुस्तीगिर होते. विहिरीचे खोदकाम करण्यात परिसरात ते प्रविण होते. गरीबीशी संघर्ष करीत राजु पैलवान हे गावात हॉटेल चालवुन आपला उदरनिर्वाह भागवितात. ते अमळनेर तालुका मल्हार सेनेचे माजी अध्यक्ष असुन त्यांच्या आई भटाबाई या मांडळ ग्रामपंचायतीच्या काही वर्ष सदस्य होत्या. मांडळ हे गाव अमळनेर तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असून या गावात हिंदू-मुस्लीम-जैन बांधवांसह 47 जाती जमातींचे लोक गुण्यागोविंदाने धार्मिक जातीय सलोखा कायम ठेवून नांदत आहेत. धार्मिक सलोखा असलेल्या मांडळ गावात ग्रामसभेत एक हजार ग्रामस्थांच्या उपस्थितीत राजेंद्र पैलवान धनगर यांची एकमताने झालेली निवड नक्कीच कौतुकास्पद असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या ग्रामसभेस सरपंच विद्याताई पाटील, माजी सरपंच किरणभाऊ जवरीलाल जैन, ग्रामसभेचे अध्यक्ष माजी सरपंच डॉ. अशोक हिंमतराव पाटील, माजी सरपंच नारायण लोटन कोळी, उपसरपंच हंसराज मोरे , ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, संजय रघुनाथ धनगर, रेती (वाळू) बंदी समितीचे अध्यक्ष सुरेश लोटन कोळी, उपाध्यक्ष संजय धोंडू कोळी, नथू पाटील, उत्तमराव वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पवार, सुरेश कोळी, विजय पाटील, विजय कोळी, दिपक बडगुजर, संतोष पाटील, भाऊराव पाटील, संतोष कोळी, रोहित पाटील, मंगलदास कांबळे, जितेंद्र पाटील, रावसाहेब कोळी, ग्रामपंचायत सदस्य डॉ. दिपक पाटील, माजी पोलीस पाटील भास्कर पाटील, सुनिल कोळी, गोरख कोळी, योगेश बडगुजर, अनुप कोळी, चंद्रकांत कोळी, नारायण महाजन, प्रविण कोळी, जितेंद्र कोळी आदी मान्यवरांचा समावेश होता.
*******

0 Comments