Header Ads Widget

नरडाणा महाविद्यालयात 'फ्रीडम रन' व 'राष्ट्रीय साक्षरता दिवस 'चे आयोजन



नरडाणा:- रा.से.यो.मार्फत नरडाणा महाविद्यालयात फ्रीडम रन व राष्ट्रीय साक्षरता दिवसाचे आयोजन  करण्यात आले.आरोग्य संपन्न व निरामय आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाने व विद्यार्थ्यानी व्यायाम, योगासन, धावण्या सारख्या सवयी दैनंदिन जीवनात अवलंबणे आवश्यक आहेत तसेच प्रत्येक व्यक्ती साक्षर  असावा असे मत प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले.
 कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.ज़ी.सोनवणे व आभार प्रदर्शन प्रा.डी.एस. ढीवरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments