मुंबई - नासिक विभागाचे माहिती उपसंचालक म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली असून ते यापूर्वी माहिती व जनसंपर्क विभागात मंत्रालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून वृत्तचित्र शाखेत कार्यरत होते
श्री इगवे यांनी नासिक येथील यशवंत चव्हाण मुक्तविद्यापीठात दृक्श्राव्य केंद्रात सन१९९१ ते २००३ याकाळात काम केले आहे, त्यांची माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र विभागात शासनाने सरळ सेवेने सन २००३ साली मंत्रालयात वृत्त चित्र शाखेत शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती,त्यांनी २००८ ते २०२१२ पर्यंत बीड जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले.
सन २०१२ ते २०१५ पर्यंत धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे त्यानंतर ते परत २०१५ पासून मंत्रालयात वरीष्ठ सहाय्यक संचालक म्हणून काम करत होते
श्री इगवे हे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथिल असून त्यांचे महाविद्यालयालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे.
इगवे यांनी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे,तसेच वृत्तपत्र विद्या पदवी आणि नाट्यशास्त्र मध्ये पदविका मिळवलेली आहे,त्यांचे नासिक विभागात उपसंचालक पदोन्नती झाली त्यामुळे स्वागत ! व अभिनंदन --- संपादक सा सुजान नागरिक पाष्टे तालुका शिंदखेडा जि धुळे
0 Comments