Header Ads Widget

धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने किर्ती गुंडलेकर व जगदीश रोकडे यांचा सत्कार



धुळे- 3 री राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा,अमेठी (उत्तरप्रदेश) येथे संपन्न होणार आहे.त्यासाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या पै,कीर्ती गुंडलेकर व पै,जगदीश रोकडे यांचा मा.आ. धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष राजवर्धनजी  कदमबांडे, प्रमुख आश्रयदाते संजय शेठ अग्रवाल,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संजय शेठ अग्रवाल यांनी दोघा खेळाडूंना प्रत्येकी अकरा हजार रुपये पारितोषिक दिले. यावेळी जिल्हा तालीमसंघाचे उपाध्यक्ष चंद्रकांतनाना सैंदाणे, रावसाहेब गिरासे,सुनिल चौधरी, उमेश चौधरी, संजय वाडेकर,महेश बोरसे,संजय चौधरी,त्रिलोक गुंडलेकर,बाबा कोळी,हिरास्वामी गुडलेकर,जितेंद्र बोरसे,संदिप पाटील,आमीन शेख, दिपक जिरे,गणेश घाडगे, व तालीम संघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा  दिल्या.

 

*******


Post a Comment

0 Comments