Header Ads Widget

सुयोग परिवारातील डॉ. शितल प्रितम पाटील यांच्या सुयोग टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे रविवारी उद्‌घाटन



धुळे- येथील साक्री रोडवरील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध अशा सुयोग  परिवारातील डॉ. सौ. शितल प्रितम पाटील यांच्या ‘सुयोग टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ चे


उद्‌घाटन समारंभ गणेशोत्सव पर्वाच्या सुमुहूर्तावर रविवार दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळात सुयोग हॉस्पिटल, साक्री रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आला असून या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. दिलीप पाटील व डॉ. प्रितम पाटील यांनी केले आहे.

डॉ. सौ. शितल पाटील या विद्यावर्धिनी सभेच्या नियामक मंडळाचे माजी चेअरमन, ख्यातनाम हृदयरोग तज्ञ डॉ. दादासाहेब दिलीप पाटील यांच्या सून व सुप्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट डॉ. प्रितम पाटील यांच्या पत्नी आहेत. 

डॉ. शितल प्रितम पाटील यांनी एम.बी.बी.एस. व एम.एस. स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ म्हणून जे.जे. रुग्णालय मुंबई येथे शिक्षण घेऊन पुढील प्रशिक्षणासाठी दिल्ली व पुणे येथे अनु्क्रमे चार व दोन वर्ष प्रजनन शास्त्रात विशेष प्रशिक्षण प्राप्त केले. डॉ. शितल पाटील गेल्या एक वर्षापासून धुळे येथे स्त्री रोग तज्ञ म्हणून सुयोग हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. वरील सहा वर्षाच्या काळातील टेस्ट ट्युब बेबी साठी आवश्यक शास्त्रोक्त मार्गदर्शन व उपचाराच्या अनुभवावरुन डॉ. शितल पाटील यांची सेवा उपलब्ध होणार आहे.  या उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जावे लागत होते. परंतु ती सोय आता सुयोग हॉस्पिटलमध्ये होणार असल्याने त्याचा गरजु पेशंटला लाभ होणार आहे.

कोरोनाचे प्रतिबंधक नियम पाळून होणाऱ्या या उद्‌घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण प्रत्यक्ष भेटून, समाज माध्यमावरून सर्वांना पाठविले आहेच. आमच्या विनंतीस मान देऊन या प्रसंगी उपस्थित रहावे व शुभाशिर्वाद द्यावेत असे आवाहन सुयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

*******


Post a Comment

0 Comments