*जनमत-*
*दोंडाईचा-* येथे शहरात काल दिनांक १० सप्टेंबर शुक्रवार रोजी शहरात तीन वेगवेगळ्या घटना झाल्या असुन त्यात दोन जणांचा अकस्मात मुत्यू तर एक तरूणी गहाळ झाल्याची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीसांनकडून मिळालेली माहिती अशी की,काल दुपारी २.०० वाजता विद्या काँलनी येथे राहणारे देवेंद्र भटेसिंग गिरासे हे आपल्या परिवारासह श्री गणेशाची स्थापना करून बैठक हाँलमध्ये गप्पा मारत असताना अचानक काही वेळपासुन रूममध्ये गेलेली आपली पत्नी मंगलाबाई ही बाहेर आलेली नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रूमकडे गेले असता रूम बंद मिळाले.आवाज दिल्यावरही आतुन पत्नीने प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीच्या आतुन झाकले असता.त्यांना पत्नी मंगलाबाई ही सिलींग फँनला कपडे वाळण्याच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.त्यानंतर त्यांनी लागलीच आरडाओरड केली असता घरातील व शेजारील मंडळी गोळा झाली. यावेळी तातडीने रूमचा दरवाजा तोडून पत्नी मंगलाबाईस खाली उतरवत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी श्री अमोल भामरे यांनी मुत घोषित केले. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात सासरे श्री भटेसिंग लालसिंग गिरासे वय-६८,धंदा-शेती राहणार भिलाली ता.अमळनेर, जि.जळगाव यांनी रितसर खबर दिली आहे. मयत मंगलाईच्या ( वय-३५) मागे पती, दोन मुली, सासु-सासरे,पुतणे,जेठ-जेठाणी आदी परिवार आहे.
संध्याकाळी सहा वाजता ठेवलेल्या अंतिम यात्रेत राजपुत समाज हितवर्धक संस्थेचे श्री रामसिंग गिरासे, श्री जे.पी.गिरासे, लोणखेड्याचे माजी. सरपंच श्री मानसिंग गिरासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री काशीनाथ राऊळ,परसामळचे कुऊबा संचालक व माजी झेडपी सदस्य श्री जयसिंग गिरासे, माजी कुऊबा संचालक श्री डी.एस. गिरासे,मुकटीचे श्री जितेंद्र परमार, भाजपाचे शहराध्यक्ष श्री प्रवीण महाजन, नगरसेवक श्री नरेंद्र गिरासे, श्री चिरंजीव चौधरी, नगरसेवक पती श्री जितेंद्र गिरासे सर यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या घटनेत कै. माजी नगरसेविका अंजनाबाई रामराख्या व माजी नगरसेवक गिरधारीलाल रामराख्या यांचा पुतण्या राजेंद्र उर्फ लालू बलराम रामराख्या वय- ३५ राहणार-सिन्धी काँलनी दोंडाईचा यांना आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता झोपेतच ऱ्हदय विकाराचा तीव्र झटका येऊन मुत्यू झाला आहे. त्याची अंतिम यात्रा करोना-डेंग्यू-डेल्टापल्सचे नियम पाळत.आज दुपारी१२.०० वाजता ठेवण्यात आली आहे. मयतच्या मागे पत्नी, मुलगी काका-काकू,तीन भाऊ-वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
तर तिसऱ्या घटनेत वर्षी येथे राहणारे व सध्या दोंडाईच्यात वास्तवास असणारे वडार कुटूबांतील वीस वर्षाची मुलगी काल दिनांक १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी दोंडाईचा बसस्थानकहून नंदुरबार साठी बसली मात्र नंतर नंदुरबार बसस्थानक येथे मिळून आली नाही. म्हणून गहाळ झाली आहे आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात सेट्रींग काम करणारा मुलीचा भाऊ गेले असता चोवीस तासात नोंद घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मुलीच्या भावाने बहीण गहाळ झाल्याची तोंडी माहिती प्रत्यक्ष जावून दिली आहे.


0 Comments