नरडाणा रेल्वे स्टेशनवर लांब पल्याच्या गाड्याना थांबा मिळावा, स्टेशन भागातील रहिवास्यासाठी बोगदा मंजूर करावा, तसेच मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू करून त्यापैकी धुळे-नरडाणा मार्गा चे काम प्रथम प्रथान्याने करावे या मागण्याचे निवेदन संजीवनी सिसोदे जिल्हा परिषद सदस्य धुळे व मन्साराम बोरसे सरपंच नरडाणा यांनी माजी मंत्री आ जयकुमार रावळ यांना दिले.
या मागणीची दखल घेवून माजी मंत्री आ जयकुमार रावळ यानी केंद्रीय रेल्वे बोर्ड- यात्रा सुधार समिती (पीएसी) च्या नियोजीत अभ्यास दौरात नरडाणा रेल्वे स्टेशनचाही समावेश केला.
या दौरात बोर्ड सदस्य डॉ राजेन्द्र फडके, श्री छोटुभाई पाटील, श्री कैलाश वर्मा, श्री गिरीश राजगोर, विभाजी अवस्थी, रेल्वे अधिकारी सुमन हंसराज, अजय सानप यानी नरडाणा रेल्वे स्टेशनला भेट दिली.
यावेळी नरडाणा गावाच्या वतीने स्वागपर कार्यक्रम झाला. जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे, सतीश चोरड़िया व मान्यवरांनी आपल्या मागण्या मांडताने सागितले की नरडाणा हे मुबई-आग्रा महामार्ग व सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरिल औधोगिक वसाहत व दळणवळणाच्या सुविधा असलेले बाजारपेठेचे गांव आहे. महामार्गावर इंदोर ते मालेगाव मधील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नरडाणा रेल्वे स्टेशनवर लाब पल्याच्या सर्व गाड्याना थांबा मिळावा अशी नरडाणा ग्रामस्थाची अनेक वर्षोंपासूनची मागणी आहे.
नरडाणा स्टेशन भागात मोठी वसाहत आहे. यांचा दैनंदिन शिक्षण, आरोग्य व व्यवहारिक संबंध नरडाणा गावाबरोबर येतो. रेल्वे मार्गाचे जाळे ओलांडून येणे-जाणे विद्यार्थी, वृद्ध व शेतकरी बांधवासाठी गैरसोईचे आहे. त्यामुळे नरडाणा रेल्वे मार्गावर बाॅक्स बोगदा (आर.यु.बी.) मंजूर होणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर मंजूर मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाला निधी मिळून काम जलदगतीने सुरु होणे परिसराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. मनमाड-इंदोर मार्गापैकी धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाचे काम प्रथम प्राधान्याने झाल्यास अत्यंत कमी खर्चा व कमी वेळेत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे नरडाणा रेल्वे स्टेशनवर जोडली जावून नडाणा जंक्शन बनेल. वाहतुकीवरील वेळ व पैसा वाचून परिसर विकासाचा वेग वाढेल.
यावेळी कमिटी सदस्य राजेंद्र फडके, छोटू पाटील व रेल्वे अधिकारी सुमन हंसराज यांची मनोगतात सागितले की नरडाणा हे दळणवच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्याबरोबर, रेल्वे बोर्ड च्या मिटिंग मधे सर्व मागण्या मांडून मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या कार्यक्रमाला बाबासाहेब संजय सिसोदे, प्रा आर जी खेरनार, मन्साराम बोरस, प्रशांत सिसोदे, धनराज गाढवे, सुभाष संकलेचा, प्रा एस टी भामरे, आर ओ पाटील, संदिप निकम, विशाल मलकेकर, शाबिर बोहरी, मयूर सिसोदे व सिध्दार्थ सिसोदे व ग्रामस्थ हजार होते.

0 Comments