Header Ads Widget

*ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी नोंदणी व मुलाखात देऊन रोजगार प्राप्त करण्याचे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा. संदीप दादा बेडसे यांचे युवकांना आवाहन*



       कोरोना विषाणु संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मागील दिड वर्षांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन ची परिस्थिती आहे. यादरम्यान अनेक कारखाने, कंपन्या तसेच आस्थापणे बंद होऊन अनेकांच्या नोकऱ्या जाऊन प्रचंड बेरोजगारीची भयानक परिस्थिती निर्माण झाली. तसेच परप्रांतीय कामगार वर्ग देखील स्थलांतरीत होऊन आपापल्या राज्यात स्थिरावला. लसीकरण तसेच रुग्णांचे कमी होणारे प्रमाण यामुळे शासनाने काही अटी व शर्थींच्या अधीन राहून उद्योगधंदे, आस्थापने पुर्वपदावर सुरु करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. यामुळे संबंधित आस्थापनांना मनुष्यबळाची व स्थानिक बेरोजगार उमेदवारांना नोकरीची आवश्यकता लक्षात घेऊन पुन्हा रोजगार निर्मिती होण्यास मदत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे यांच्यातर्फे 27 आणि 28 सप्टेंबर रोजी *ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हा मेळावा होईल. *यामध्ये मुलाखाती या व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype, Whats App, Zoom, Google Meet) तसेच मोबाईल दूरध्वनीद्वारे* होतील असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकाद्वारे कळविले आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकीत कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे *www.rojgar.mahaswayam.gov.in* या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या व मेळाव्यास ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सवर मुलाखती होतील. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा. त्यासाठी वरील संकेतस्थळावर लॉग-इन करावे.
       नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअर वरून *Mahaswayam* हे मोफत ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. तसेच लॉग इन करून मेळाव्यातील उपलब्ध रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावेत.
Mahaswayam हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahaswayam.activity
      इच्छुक उद्योजकांनी रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Pandit Dindayal Upadhyay Job Fair पर्यायावर Click करून Dhule Online Job Fair 2 यांमध्ये अधिसूचित करावी. याबाबत काही अडचण असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी ०२५६२-२९५३४१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. रोजगार मेळावा ऑनलाईन होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कार्यालयात किंवा नियोक्त्यांकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून गर्दी करू नये.

        *सदरील ऑनलाईन मेळाव्याचा शिंदखेडा तालुक्यातील तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मा. संदीप दादा बेडसे यांनी आवाहन केले आहे.*

Post a Comment

0 Comments