अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात पांझरा मध्यम, जामखेडी मध्यम प्रकल्प, मालनगाव मध्यम प्रकल्प, इतर लघु प्रकल्प व इतर मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेता अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून आज दि. 29/9/2021 रोजी सकाळी 11 वाजता नदीपात्रात 5033 कुसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तसेच अक्कलपाडा धरणाच्या खालच्या बाजूवरील मुक्त पाणलोट क्षेत्रातील आवक बघता पांझरा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे, ढोरे व अन्य साहित्य नदीजवळ नेऊ नयेत, तरी सर्व नागरिकांनी सावध रहावे अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन कक्ष धुळे जिल्हा व पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे...
0 Comments