Header Ads Widget

⭕आ.अनिल पाटलांच्या सौजन्याने उद्या शुक्रवारी महा लसीकरण शिबीर ⭕सानेगुरुजी शाळेत भव्य आयोजन

⭕आ.अनिल पाटलांच्या सौजन्याने उद्या शुक्रवारी महा लसीकरण शिबीर

⭕सानेगुरुजी शाळेत भव्य आयोजन

अमळनेर-संपुर्ण कोरोना कालावधीत न डगमगता जनतेच्या काळजीपोटी सतत क्रियाशील राहणारे आ.अनिल पाटील यांनी लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी महा लसीकरण शिबिर शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील सानेगुरुजी शाळेत लसीकरण शिबीर आयोजित केले आहे.
       सदर शिबीर 18 प्लस गटातील सर्व व्यक्तींसाठी खुले राहणार असून याठिकाणी कोव्हीशिल्ड लसीचे डोस सर्वाना देण्यात येणार आहे, सदर महा शिबिराची जोरदार तयारी आमदारांच्या टिमने सुरू केली असून मागेल त्याला लस हेच आमदारांचे उद्दिष्ट असणार आहे, सदर शिबिरासाठी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंदाचे अनमोल सहकार्य लाभणार आहे, सकाळी 8 वाजे पासुन शिबीर स्थळी नाव नोंदणीस सुरवात होणार असून सकाळी 9 वाजेपासून सदर शिबीरास प्रारंभ होणार असून शिस्तीप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या धोरणानुसार लसीकरण करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन कोरोना मुक्त मतदारसंघ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आ अनिल पाटील यांनी केले आहे. 
      शिबीरात दिव्यांग,गरोदर महिला,स्तनदा माता तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल त्याचबरोबर महाविद्यालये सुरू होणार त्याची पूर्वतयारी म्हणून महाविद्यालयातील तरुण तरुणींसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यासोबतच महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र दोन रांगा असतील. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments