Header Ads Widget

* संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा= प्रकाश पाटील *

           
================================ डोंगरगाव (प्रतिनिधी) आर आर पाटील= यावर्षी पावसाचे जून व जुलै महिन्यात एक दोन किरकोळ पाऊस  झालेत त्यामुळे पाण्याअभावी बरेच पिके जळाली होती म्हणून दुबार कापूस लावणी व इतर पिकांची पेरणी ही झाली होती मे महिन्यापासून शेती तयार करून उन्हात व रात्री-बेरात्री कापूस पिकांना मोठे करून शेवटी जून-जुलै महिन्यात पावसाच्या अभावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कापसाच्या पीकला  मुकावे लागले म्हणून दुबार कापूस लावणी देखील झाली ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रमाणापेक्षा खूपच जास्त पाऊस झाला यामुळे कापूस कांदा भुईमूग कडधान्य बाजरी मका  ज्वारी भाजीपाला इत्यादीं सर्व च पिकाचे  नुकसान झाले महाग अस  कांदा पिकावर करपा रोग पडल्याने कांदा नष्ट झाला कापूस पिकावर 100% लाल्या रोग आला काही कापसाची बोंडे शिल्लक होती ती जास्त पाण्यामुळे पूर्ण कुजून गेलेत जी काही प्रमाणात शिल्लक होती ती काढण्यासाठी जास्तीची मजुरी देऊन शेतकरी हतबल झाला असून भांडवल देखील अजिबात निघणार नाही अतिवृष्टीचे पंचनामे हे होत राहतील परंतु त्या अगोदर महाराष्ट्र सरकारने सरसकट संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे

Post a Comment

0 Comments