Header Ads Widget

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट

 

पुणे- राज्यात गुलाब चक्रीवादळ येऊन धडकल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आले आहे. मुंबईमध्येही रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

रविवारी संध्याकाळी हे चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता हळुहळू कमी झाली, तरी त्याचा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याने राज्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रविवारी दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी चंद्रपुरात रेड अॅलर्ट आहे; तर मंगळवारी ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव येथे रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments