Header Ads Widget

शिंदखेडा मतदार संघातील ८६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे DPR तयार -संदीप बेडसे यांच्या प्रयत्नां यस




आज दि.२२ सप्टेंबर रोजी मुंबई येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऑफिस मध्ये माननीय श्री किशोर राजे निंबाळकर साहेब(IAS), सदस्य सचिव मजिप्रा. यांची शिंदखेडा मतदार संघातील चिमठाणे+८५ अशा ८६ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेबाबत तसेच शिंदखेडा तालुक्यातील अजंदे(बु),अमळथे,बेटावद,दभाशी,लंघाणे,भिलाने दिगर,मुडावद,नवे कोडदे,निमगुळ,पढावद, रंजाणे,साहुर,सुलवाडे,चवळदे,वालखेडा,वणी,वरपाडे,झोतवाडे व आरावे असे एकुण १९ गावे व शिंदखेडा मतदार संघातील साक्री तालुक्यातील कढरे, नागपूर,ऐचाळे, बळसाने,छावडी (अमोदे), दुसाने, हट्टी बु., हट्टी खु.,म्हसाळे,फोफरे,सतमाने,उभरांडी,आयने मळखेडे,उभंड दगडी विहीर व छावडी असे एकुण १५ गावांमधील पाणीपुरवठा योजनेसाठी सुधारात्मक पुर्ण: जोडणी (Retrofitting) कामांचे DPR ,अंदाजपत्रके व त्यास मान्यता लवकरात लवकर होणेबाबत  पाठपुरावा करण्यासाठी भेट घेतली.
मा.श्री.निंबाळकर साहेबांनी सर्व कामांबाबत त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन सदरील कामांना तातडीने मंजुरी देऊन पाणीपुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील याबाबत आश्वासित केले. तसेच ८६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे DPR तयार झाले असून मा उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी दिलेल्या निदेशानुसार सदरिल कामे लवकरात लवकर मार्गी लागतील असे आश्वस्त केले.

आपलाच,
संदीप बेडसे
माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँ.पार्टी धुळे ग्रामीण.


Post a Comment

0 Comments