Header Ads Widget

धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर 3 ऑक्टोबर रोजी पुणे येथे ऐतिहासिक गोलमेज परिषद माजी मंत्री, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचे राज्यातील निमंत्रितांना उपस्थितीचे आवाहन


 

 धुळे-  धनगर समाज आरक्षण प्रश्नांसह अन्य महत्वपूर्ण  प्रश्नांवर रविवार दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता , पुणे येथील भारती विद्यापीठ , धनकवडी येथे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व राज्य संघटना प्रमुख , राज्यातील आजी व माजी आमदार , खासदार यांच्यासह राज्यभरातील निमंत्रित धनगर समाजाचे पदाधिकारी यांची ऐतिहासिक गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनगर समाजाचे राज्याचे जेष्ठ नेते , महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. श्री. अण्णासाहेब डांगे यांनी दिली.

सदर ऐतिहासिक गोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज संघटनेचे राज्य प्रमुख , विद्यमान व माजी आमदार, खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  कोरोना साथीच्या आजाराच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख मान्यवरांनाच सदरच्या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कोरोना साथीच्या आजाराचे सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून, सामाजिक अंतर ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सदरच्या परिषदेचे प्रमुख व निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . गेली अनेक वर्षे प्रलंबीत असणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसह समाजाच्या अनेक निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा व विचार विनिमय, आगामी धोरणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व निर्णय होणार आहेत. तरी सदरच्या गोलमेज परिषदेस निमंत्रीत मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. श्री. अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे.

 



 


Post a Comment

0 Comments