Header Ads Widget

*वर्षी ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी* *जी प सदस्या ज्योती बोरसे यांनी त्यांच्या 5लाख निधीतून बसवले आरो सिस्टीम*





शिंदखेडा :- वर्षी ता शिंदखेडा येथील जी प सदस्य ज्योती देविदास बोरसे  यांनी गावातील ग्रामस्थाना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे या साठी जी प च्या 15 वित्त आयोगाच्या निधीतून पाच लाख रुपयांचे जलशुद्धीकरण आरो व कुलिंग मशीन ग्रामपंचायत आवारात बसवले त्यात त्याच्या हस्ते आज उदघाटन झाले या वेळी सामाजिक कार्यकर्ते देविदास बोरसे, सुरेश माळी,सरपंच अरुणा सुरेश माळी, नूतन प स सदस्य भारत पवार ग्रा प उपसरपंचसह सदस्य ग्रामसेवक संजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते



 वर्षी येथील जी प सदस्य ज्योती बोरसे यांनी त्यांना मिळणाऱ्या निधीतून गावात 5 लक्ष रुपयांचे आरो सिस्टीम व कुलीग मशीन बसवले असून येथून दर तासाला एक हजार लिटर शुद्ध व थंडगार पाणी ग्रामस्थाना 5 रुपयात 15 लिटर मिळणार आहे ग्रामपंचायत ने ना नफा ना तोटा या वर फक्त मेंटन्स खर्च निघण्यासाठी 5 रुपये दर 15 लिटर पाण्यासाठी ठेवण्यात आला असून सुमारे चार ते पाच हजार ग्रामस्थांची या मुळे शुद्ध पाण्याची तहान भागणार आहे तसेच प्लॉट एरियातही  येत्या काही दिवसात नवीन एक प्लांट ग्रा प मार्फत येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Post a Comment

1 Comments