नरडाणा:- क.ब.चौ.उ.म.वि.रा.से.यो विभाग, जळगांव व कै. म. दि. सिसोदे कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण वाचन कट्टा चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी मा.प्राचार्य पाटील सरांनी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुण विकसित करण्यासाठी वाचनाची गरज व आवड असावी आणि पुस्तके 'वाचाल तर वाचाल 'असे प्रतिपादन केले. त्या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. ए. आर. वसावे, प्रा. एन. वाय. खैरनार, डॉ. उमेश जी .पाटील व सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, शिक्षेकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.जी.सोनवणे सर व आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डी. एस. धिवरे सर त्यांनी केले.

0 Comments