धुळे शहरातील संतोषीमाता चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे कांद्याने भरलेल्या पिकअपचे टायर अचानक फुटले. मात्र टायर फुटल्याने कांद्याने भरलेले पिकअप वाहन रस्त्यातच अडकून पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला.
रस्त्यात बंद पडलेल्या पिकअपमुळे वाहतूक सुरळीत करणे कठीण झाले होते. अखेर पोलिसांना टायर फुटलेले पिकअप वाहनामधील कांद्याच्या गोण्या स्वतः हमाली करीत वाहनातून काढून रस्त्याच्या किनारी नेऊन ठेवाव्या लागल्या. त्यानंतर टायर फुटलेले पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला केल्यानंतर वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करता आली आहे.

0 Comments