Header Ads Widget

डोंगरगाव येथील अकरा वर्षाच्या चिमुकल्याचा घरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यामध्ये अडकून गुदमरून दुर्दैवी मृत्यू

धुळे : डोंगरगाव (ता.शिंदखेडा) येथील अकरा वर्षाच्या कृष्णा योगेश पाटील या चिमुकल्याचा घरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यामध्ये अडकून गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

कृष्णा हा त्याच्या आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. (dhule-news-elevan-year-child-died-of-suffocation-in-a-pile-of-cotton)

आई- वडील शेतात गेले असताना घरात कोणीही नव्हते. कृष्णाने घरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यात खड्डे केले. त्याठिकाणी कृष्णाचा तोल गेल्याने त्या खड्ड्यामध्ये कृष्णा खाली मुंडके गेल्याने अडकला. कृष्णा या कापसाच्या गाठीमध्ये अडकल्यानंतर त्याने आवाज देण्याचा प्रयत्न केला. परंतु कापसाच्या गाठीमधून त्याचा आवाज बाहेर निघाला नाही. घरात व परिसरात कोणीही नसल्यामुळे ही बाब लवकर लक्षात देखील आली नाही. अखेर बराच काळ अडकून पडलेल्या कृष्णाचा कापसाच्या गाठीमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाला.

आई- वडील आले तोपर्यंत उशिर झाला

आई- वडील घरी आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. कृष्णा अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे संपूर्ण डोंगरगावामध्ये ही बातमी पसरताच गावात एकच शोककळा पसरली.



Post a Comment

0 Comments