Header Ads Widget

धमाणे येथे *स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर* नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न



धमाणे---*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर*
नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धमाने येथे दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिंदखेड्याचे तहसीलदार माननीय *श्री सुदामजी महाजन हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री देविदास पाटील व आर डी एम पी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डी.एन.जाधव* हे होते *श्रीयुत महाजन यांनी त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडुन यशाला कष्टाशिवाय पर्याय नाही असे सांगितले त्यानंतर बोलताना श्री देविदास पाटील यांनी पोलीस होण्यासाठी सुद्धा किती मेहनत घ्यावी लागते त्याचे महत्त्व सांगितले श्री डी. एन. जाधव यांनी दृष्टिकोन बदलल्यास काम करण्याची पद्धत सुद्धा बदलते असे सांगितले* यातून विद्यार्थ्यांमध्ये *प्रेरणा जागृत होऊन बराच विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करू व यश खेचून आणू अशी प्रतिज्ञा मान्यवरांसमोर घेतली* कार्यक्रमाचे *आयोजन* नूतन विद्यालयाचा माजी विद्यार्थी *श्री विशाल माळी* कुरुकवाडे याने केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे *उपाध्यक्ष माननीय दादासो उगमजी पाटील* होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आर पाटील व पर्यवेक्षक श्री जे सोनवणे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील डॉ राकेश चौधरी व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी कुरुकवाडे व धमाने गावातील महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी वाडीले व आभार प्रदर्शन विशाल माळी यांनी केले

Post a Comment

0 Comments