Header Ads Widget

*रोटरी सिनियर्स दोंडाईचाला कोविडकाळात उत्कृष्ट कामांचा सर्वोच्च प्लँटीनम कल्बचा सन्मान...*




*कोवीळ काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.,परिचारिका, न.पा.आरोग्य कर्मचारी, पोलीस विभाग,महसुल व दानशुर व्यक्तींना समर्पित केला सन्मान-मा.चेतन सिसोदिया...*

*जनमत-*

*दोंडाईचा-* जगभरातील सामाजिक सेवेतील अग्रगण्य संस्था रोटरी इंटरनँशनल दरवर्षी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये वार्षीक पारितोषिक वितरणाचा सोहळा आयोजित करीत विविध क्लबच्या केलेल्या कामाचा आढावा घेऊन सन्मानित करीत असते . संपुर्ण गुजरात व महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा एकत्रीत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६०चा बक्षीस वितरण सोहळा दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाच्या सिल्वासा येथे ट्रिट रिसार्ट ह्या नयनरम्य स्थळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.प्रशांत जानी , हिता जानी , रो. संतोष प्रधान ,रो.श्रीकांत इंदाणी , रो.निहीर दवे इ.अनेक मान्यवराच्यां उपस्थितीत दि.१७ आँक्टोबर रविवार रोजी संपन्न झाला.

रोटरी ३०६० डिस्ट्रिक्टमध्ये एकुण ११२ क्लब असुन ८७१७ सदस्य आहेत. त्यात विविध क्लबच्या अध्यक्ष व पदाधिकारींना गौरविण्यात आले.रोटरी सिनायर्स दोंडाईचाच्या माध्यमातून कोविडच्या काळात संकटाचे संधीत रुपांतरीत करीत दोंडाईचा शहर व परिसरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे ४० रुग्णांसाठी दोंडाईचा सोशल ग्रुपमधील दानशुर सदस्यांच्या मदतीने सेंट्रल आँक्सिजन सिस्टीम बसवुन दररोज आवश्यक सिलेंडरचा पुरवठा ,रुग्णांसाठी लोखंडी बेड ,गाद्या , आँक्सिजन फ्लो मिटर आदी पुरवीण्यात आले होते.

 तसेच वर्षभरात क्लबच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे ,अन्नदान , सार्वजनिक ठिकाणी सँनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले,अशा प्रकारे कोविडकाळात सर्वोत्कृष्ट काम केल्यामुळे रोटरी डिस्ट्रिक्ट तर्फे सर्वोच्च सर्वीस प्रोजेक्ट प्लँटीनम अवार्ड , रक्तसंकलन अवार्ड , अन्नपूर्णा अवार्ड, सर्वाधिक आरोग्य शिबिरे, अँक्टीव्ह प्रेसिडेंट, अँक्टीव्ह क्लब आदी अनेक सन्मानाने अध्यक्ष चेतन सिसोदिया, डॉ राजेंद्र पाटील, सौरव अग्रवाल,डॉ अनिल धनगर, अमन जयस्वाल, डॉ गणेश खैरनार,राजेंद्र परदेसी,प्रविण महाजन आदी सदस्यांना एकुण ११ अवार्ड देऊन  गौरवण्यात आले.

रोटरी सिनियर्सचा हा सन्मान म्हणजे कोविडकाळातील सर्वोत्कृष्ट काम केल्यामुळे झाला आहे. परंतु रोटरीसोबत सर्वोत्कृष्ट काम करणारे व सेंट्रल आँक्सिजन सिस्टीमसाठी मदतीचा हात पुढे करणारे सर्व दानशूर व्यक्ती, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नगरपलीकेचे सर्व अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, पोलीस तसेच महसुल विभागाचे कर्मचारी यांना समर्पित करीत असल्याचे मा.अध्यक्ष श्री चेतन सिसोदिया यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments