शिंदखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय झाले पाहिजे यासाठी विविध शासकीय पदाधिकारी यांना
निवेदन दिलेत. तरीही शासन या कडे लक्ष देत नाही म्हणून शिंदखेडा विकास संघर्ष समितीने शिंदखेडा परिसरातील 45-50 गावातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व जि. परिषद सदस्यांना स्वखर्चाने त्यांच्या गावी जाऊन शिंदखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय कसे आवश्यक आहे हे
समजावून त्यांच्याकडून या विषयासाठी *पाठिंबा पत्रक मोहीम* राबवून पाठिंबा पत्रक मिळवून ते सर्व पत्रक मा. मुख्यमंत्री व मा. आरोग्य मंत्री यांना सादर करण्याचे ठरविले.त्यामुळे जास्तीत जास्त जनभावना शासन दरबारी पोहचेल व शासन शिंदखेडा व परिसरातील नागरिकांची मागणी मान्य करतील. यासाठी दीड ते दोन महिने पावेतो समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतलेत. या मोहिमला सर्व सरपंच यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि समितीच्या सदस्यांचे कौतुक ही केले.
*यात चिरणे, कदाने, दरखेडा, महाळपुर,निशाणे,बाभूळदे, चौगाव बु, चौगाव खु, वरूळ, शोनशेलू,जोगशेलू इ* गावातील सरपंच यांना पाठिंबा पत्रक साठी समितीचे सदस्य भेटलेत.



0 Comments