==============================
== डोंगरगाव (आर आर पाटील)= धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती त्यामुळे आज सकाळपासून अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नीरज चौधरी हे काम पाहत आहेत आज शेवटच्या दिवशी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश त्र्यंबक पाटील डोगर गाव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या दिवशी त्यांचे सोबत अर्ज सादर करताना प स सदस्य राजेंद्र देवरे ,मा उपसरपंच आबा मुंडे ,प्रवीण पवार ,विनायक पाटील इत्यादी उपस्थित होते

0 Comments