Header Ads Widget

*_आदर्श मुख्याध्यापक यशवंत कढरे बुद्ध, फुले, शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित-प्रा. मोतीलाल सोनवणे_*




    *_नरडाणा  ता.शिंदखेडा जि.धुळे येथील आयु. श्री. यशवंत उत्तम कढरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) हे अत्यंत हुशार व अभ्यासू आहेत. त्यांचे असामान्य आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रचंड लोकसंग्रह आदिवासी व दलित जनप्रश्नांना समन्वयातून मार्ग काढण्याचे अनोखे कसब त्यांच्यात आहे. एक निर्मळ प्रेमळ व उदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची खास ओळख आहे. समाजसेवेची त्यांना प्रचंड आवड आहे._*
      *_त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कल्याण भवन धुळे येथे दिनांक १५/१०/२०२१ रोजी धम्मचक्र प्रवर्तन आणि अशोक विजयादशमीच्या दिवशी बुद्ध, फुले, शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती आयु. रमेश सोनवणे, प्रमुख पाहुणे अशोक सरस्वती बोधी, एडवोकेट मधुकर भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला._*

Post a Comment

0 Comments