Header Ads Widget

बायो डिझेल पंपावर धुळे एलसीबीची मोठी कारवाई

धुळे,--- शहरातील बिलाडी रोडवरील एकता नगरात छापा टाकून एलसीबीने बायो डिझेलचा ३ हजार लिटर साठा हस्तगत केला असून हे बायोडिझेल गेल्या देान वर्षापासून सर्रासपणे शासकीय सेवेतील १०८ रुग्ण वाहिकांमध्ये वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी एलसीबीचे पो ना गौतम राजेंद्र सपकाळे यांनी देवपुर पोलिस बिलाडी रोडवर बायो डिझेल पंपावर एलसीबीचा छापा ३ हजार लिटर इंधन जप्त, १०८ रग्णवाहिकांमध्ये सुरु होता वापर ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. १० रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास देवपुरातील बिलाडी रोडवरील एकता नगरात सर्व्हे नं. ८६, प्लॉट नं. ५६ येथे छापा टाकला. या ठिकाणी २ लाख ६६ हजार ४०० रुपये किंमतीच्या पाच हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्यांमध्ये साठवलेले बायोडिझेल तसेच प्लॉस्टिक कॅन अणि काही साहित्य आढळून आले. पोलिसांनी यावेळी भारत विकास ग्रुप (बी.व्ही.जी.) इंडिया लि. या कंपनीच्या धुळे विभागाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. उमेश राजन साने व सुपरवाझर जयेश राजेंद्र पाटील यांच्याकडे सविस्तर चौकशी केली. त्यात सन २०१९ पासून बिलाडी रोडवरील एकता नगरात बायोडिझेल हे इंडस्ट्रियल ऑईल वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येत होते. विशेषतः धुळे विभागातील आपत्कालीन वैद्यकिय सेवा देणार्या १०८ रुग्णवाहिकांमध्ये हे बायोडिझेल इंधन सर्रासपणे टाकण्यात येत होते. महाराष्ट्र शासनाने बायोडिझेल वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यास प्रतिबंधीत केलेले असतांना शासकीय सेवेतील रुग्णवाहिकांमध्येच हे बायोडिझेल टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती या चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, भारत विकास गृपचे व्यवस्थापक यांनी कंपनीच्या आर्थिक फायद्यासाठी योगेश्वर केमीकल्स लि. आर. ३४५, रबाळे एमआयडीसी, टी टी सी इंडस्ट्रियल परिसर, ठोण बेलापुर रोड, नवी मुंबई ४००७०१ यांच्याकडून एल.यु.बी. मिस्क नावाचे इंडस्ट्रियल ऑईल खरेदी करुन सरद बायोडिझेल शासनाचा महसुल बुडवून फसवणुक करीत परस्पर विक्री केली. यावरुन भारत विकास गृप इंडिया लि. पुणे या कंपनीच्या व्यवस्थापक व योगेश्वर केमीकल्स कंपनीचे व्यवस्थापक अशा दोन जणांवर भादवि कलम २८५, ४२०, १०९ सह जिवनावश्यक वस्तु अधि. ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुस्थान समाचार

Post a Comment

0 Comments