नरडाणा :- रॉयल्टी पेक्षा जास्त मुरूम भरून जात असताना शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी माजी पं. स. सदस्य लोटन देसले रा माळीच व इतर चार जणांच्या विरुद्ध तहसीलदारांना धक्काबुक्की करणे शासकीय कामात अडथळा करणे प्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे गावाजवळ मुरूम ने भरलेली चार वाहने क्रमांक एम एच ३९ ए डी ०९०४ एम एच ३९ एडी ८१११ एम एच ४८ टी ९३३६ व एका अज्ञात वाहन अशी एकूण चार वाहने गौण खनिज भरून जात असताना शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैंदाणे व त्यांच्यासह असलेल्या झाशीची राणी महिला पथकाने त्यांना थांबवून विचारपूस केली असता वाहनांमध्ये शासकीय रॉयल्टी पेक्षा पाच ब्रास अतिरिक्त मुरूम भरून त्याची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले संबंधित वाहने ही तहसिल कार्यालयात कायदेशीर कारवाईसाठी घेऊन जाण्याचे म्हटले असता माजी पं. स. सदस्य लोटन देसले यांनी तहसीलदार यांच्याशी शाब्दिक वाद घालून अरेरावी व अपशब्द वापरून त्यांचा हात धरून रस्त्याच्या कडेला ओढून नेले तसेच देसले यांच्यासोबत असलेल्या चार इसमांनी तहसीलदार यांना घेराव घालून संबंधित वाहनांकडे जाण्यास मज्जाव करून वाहने पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भादवि कलम १४३, १४७, ३३२, ३४१, ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे यासंदर्भात पुढील कारवाई सपोनि मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील व पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत पुढील तपास करीत आहेत यासंदर्भात तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी दैनिक पुण्यनगरीशी बोलताना म्हटले की वाळू मुरुम व खडी अशा विविध गौणखनिज वाहून नेणाऱ्या वाहनांची कसून चौकशी सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सक्त कारवाई करू आत्तापर्यंत विविध चार प्रकारचे गुन्हे यासंदर्भात दाखल करण्यात आले असून 35 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर सात वाहने अजूनही शिंदखेडा तहसिल कार्यालयात उभी आहेत.
Sent from my Samsung Galaxy smartphone.
0 Comments