अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले, यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल डिझेल व जीवन आवश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात जनजागृती अभियानाचा शुभारंभ सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी 9:30 वाजता दोंडाईचा येथे करण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटी व दोंडाईचा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून
होळी चौक, आजाद चौक, बस स्टॉप, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,निर्मल एम्पोरियम,तुफान हॉटेल ते बस स्टॅन्ड, पर्यंत जनजागरण यात्रा अभियान राबविण्यात येणार आहे.बस स्टँड समोरच जनजागरण अभियानाचा समारोप करण्यात येईल तरी दोंडाईचा शहरातील शिंदखेडा शहरातील तालुक्यातील सर्व नागरिकांनी जनजागृती अभियानात सामील व्हावे या जनजागरण यात्रेत जिल्ह्याचे प्रभारी तथा माजी राज्यमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव,आमदार प्रणिती ताई शिंदे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील व प्रभारी प्रदीपजी जोशी उपस्थित होणार आहेत जागरण यात्रा अभियानात जनतेने व पदाधिकाऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन जिल्ह्याचे अध्यक्ष मा.श्यामकांत दादा सनेर यांनी केले आहे.

0 Comments