Header Ads Widget

प्रवाशांची आर्थिक लुट थाबवा



धुळे : राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी बससेवा बंद आहे. याचा गैरफायदा घेत खासगी वाहनधारक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. प्रवाशांची ही आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे केली.
गेल्या १५-२० दिवसांपासून एसटी बससेवा बंद असल्याने शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने आरटीओ विभागास पर्यायी प्रवासी यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून पुरेशी व योग्य भाडे आकारून पर्यायी वाहने उपलब्ध होत नाहीत. बससेवा बंद असल्याचा गैरफायदा घेत खासगी वाहनधारक मात्र प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी, गोरगरीब प्रवाशांना सहकार्य करावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रोहित चांगरे, सचिव प्रशांत वाघ तसेच प्रदीप साटोटे, रावसाहेब मोरे, गुड्डू अहिरे, जयेश शिंदे, आबिद शहा, जावेद मिर्झा आदींनी पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांच्याकडे केली.

Post a Comment

0 Comments