दोंडाईचा--ठराविक नागरिकांचेच हितजोपास
णाऱ्या भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला असून गरिबांना आणखी गरीब बनविण्याचे काम ह्या सरकारने केले आहे असा आरोप काँग्रेसचे धुळे जिल्ह प्रभारी व मा.राज्यमंत्री ताईसो शोभाताई बच्छाव यांनी
दोंडाईचा ता शिंदखेडा येथे केला आहे.
काँग्रेसच्या जनजागरण अभियानाच्या पार्श्वभुममीवर २९ नोव्हेम्बर रोजी मा.राज्यमंत्री ताईसो यावेळी जनजागृती अभियानाची माहिती दिली ते म्हणाले भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान बदलण्याचे काम केले आहे, पेट्रोल, डिझेल स्वयंपाकाच्या गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले, वाढत्या महागाईने नागरिक होरपळून निघाले आहेत.
नागरिक आता भाजपच्या या कारभाराला वैतागले आहेत केंद्र सरकार शेतकरी विरोधी असून, या सरकारने केलेल्या कायद्याच्या
विरोधात काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली. मात्र ७५० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकारला हे कायदे रद्द करावे लागले हे देशाचे दुर्भाग्य आहे.
प्रदेशाध्यक्ष मा.नानासाहेब
पटोले, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जनजागृती अभियान सुरू केले आहे.या अभियानात काँग्रेसची सत्ताअसतांना असलेली स्थिती, याची महिती नागरिकांना दिली जात आहे, असे मा राज्यमंत्री मा.शोभाताई बच्छाव यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्यामकांत सनेर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज आबा करणकाळ मा.जि.प.सदस्य हेमराज
नाना पाटील , किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील नरेंद्र पाटील, आबा मुंडे, पांडुरंग माळी, राहुल माणिक, महेंद्र देसले शिवा बापू, उमेश भोई, मनोज भोई, प्रवीण पवार ,, विजेंद्र झालसे, नितीन
देसले, विलास गोसावी, वीरेंद्र गोसावी, खंडा भदाणे श्यामु मालचे , तनु देसले , भैया माळी हुसेन बोहरी खाटीक, राजू, मोना देशमुख शेख,, कैलास कल्लू पठाण आखाडे वसंत भारत बापू जाधव कोळी संभाजी, मुन्ना पाटील, मोनुबाबा शेख, संजू माळी, पावभा कोळी, प्रश्नांत पाटील, रतीलाल पाटील, देवमन पाटील भोजु गिरासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments