धरणगावात पोलिस उपनिरीक्षकाची नियत फिरली! रक्षकच बनला भक्षक !ओळखीचा फायदा घेवून काढली मुलीची छेड ! मग संतप्त जमावाने पब्लिक मार देवुन मोडली खोड! हजारोंच्या संख्येत माजी आमदारसह नेत्यांचा पोलिस स्टेशनला घेराव! विकृत पोलिस उपनिरिक्षकाची झाली तात्काळ बदली! निलंबनाच्या कारवाईसाठी नागरिकांच्या तक्रारी!
धरणगाव - येथील पोलिस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या एका पोलिस उप निरीक्षकाने भरदिवसा विकृत्पणाचा कळस गाठून पोलिस खात्याला काळीमा लावणारे कृत्य केल्याची घटना आज दुफारी घडली आहे. चार दिवसांपूर्वीच फरकांडे येथील कापूस व्यापाराच्या लुटीत झालेल्या व्यापारीच्या खून प्रकरणी एका पोलिस कर्मचारीला झालेल्या अटकेने आधीच पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी चिंतेत आहेत. त्यात हा खात्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने वरिष्ठांचा आधिक मनस्ताप वाढला आहे.
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेमधून होणारे अत्याचार जितके माणुसकीला काळीमा लावणारे आहेत. त्याहूनही अमानुष व विकृतीचा कळस गाठणारी ही घटना आहे. ज्यांचेवर सुरक्षेची जबाबदारी आहे. त्याच पोलिस खात्याच्या एखाद्या विकृत अधिकाऱ्याकडून जेव्हा ओळखीचा फायदा घेऊन एखाद्या मुलीची छेड काढली जात असेल,जनतेचा रक्षकच भक्षक बनणार असेल तर जनतेनं विस्वास ठेवायचा तरी कुणावर? असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. धरणगावच्या या घटनेने शहरात असुरक्षिततेचे व भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
साधारणतः आजकाल सार्विकडे मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतित प्रत्येक पालक चिंतेत आहेत.स्वाभाविक त्या अनुषंगाने येथील एका पालकाने सदरच्या पोलिस उप निरीक्षकाशी ओळख असल्याने व मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने तिला कुणाकडून त्रास होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लक्ष देण्याचे सांगीतले होते. नव्हेतर त्याच्याशी ओळख करून देवुन कुणी काही त्रास दिल्यास फौजदार काकाला भेटायचं म्हणून सांगीतले होते. या ओळखीचा फायदा घेत गेल्या पाच दिवसापूर्वी या विकृत माणसाने सदर मुलीचा मोबाईल नंबर कुठून कसा मिळविला माहीत नाही. पण मिळविला व चार दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी फोनवर सम्पर्क करायला सुरवात केली होती असे एकण्यात आहे. मात्र आज या विकृत मनोवृत्तीच्या माणसाने सदर मुलीला सम्पर्क करून वेगळं कारण दाखवुन एका ठिकाणीं बोलावले व ती मुलगी आल्यावर दोघांची सेल्फी काढून लगेचच ब्लॅकमेल करायला सुरुवात केल्याचे सांगीतले जात आहे. मात्र त्याचे हे वेगळे रूप पाहून मुलगी एकदम घाबरली व तेथून पळत घरी निघाली.सदरचा प्रकार तिने घरी सांगितल्यावर घरच्यांनी इतरांच्या मदतीने या विकृत पोलिस उप निरीक्षकाला गाठले. त्याला जाब विचारत असताना मोठमोठ्याने होणारा आरडाओरड पाहता हा हा म्हणता मोठा जनसमुदाय जमला अन् या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला धू धू धुतला. अन् पोलिस स्टेशनला धींड काढत नेला. या प्रकाराची वार्ता पूर्ण शहरात पसरली तसतशी गर्दी पोलिस स्टेशनच्या आवारात जमली. माजी आमदार स्मिताताई वाघ, भाजपाचे पी. सी. पाटील व सर्वपक्षीय पदाधिकारी अन् कार्यकर्ते जमा झाले.जनसमुदायाच्या संतप्त भावना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन व मुलीच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून या राजकिय नेत्यांनी तक्रार न देण्याचा निर्णय घेवुन मध्य साधून संबधित पोलिस उपनिरीक्षक गवारेला अद्दल घडावी व भविष्यात अजून कुणी तसे धाडस करू नये म्हणून त्याची प्रथम तात्काळ बदली करून निलंबनाचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी लावून धरली. पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी संपुर्ण परिस्थिती अतिशय व्यवस्थितपणे हाताळून घडला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी तात्काळ बदलीचे आदेश काढले. परन्तु जमलेला संतप्त जमाव त्या विकृत पोलिस उपनिरीक्षकाच्या नीलंबनावर अडून बसल्याने त्याच्याविषयी जनतेच्या समुहिक तक्रारी दाखल करून घेत निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्याच्या आश्वासनाने जनसमुदाय माघारी फिरला.
साभार
0 Comments