धुळे : शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून केलेल्या कारवाईत नशेच्या बाटल्या आढळून आल्या.
धुळे (Dhule) शहरातील चाळीसगाव रोड पोलीस (Dhule Police) ठाण्याच्या गजानन कॉलनी परिसरात काही व्यक्तींकडून नशेचे अनोख्या प्रकाचे द्रव्य विक्री केले जात होते. याबाबतची माहिती चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता या छाप्या दरम्यान पोलिसांना विविध नशेच्या बाटल्यांमधून नशा येणारे द्रव्य आढळून आले आहे.
५८ हजाराचा मुद्देमाल
पोलिसांच्या (Police) कारवाईत जवळपास ४८२ नशेच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. ज्यांची बाजारात जवळपास ५८ हजार ५६० रुपये इतकी किंमत मानली जात आहे. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच हा नशेचा बाजार चालविण्यासाठी उपयोगात येत असलेल्या या नशेचा बाटल्या कुठून व कशा पद्धतीने आणत होते. याचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलिस करीत आहेत.
0 Comments