शिरपूर तालुक्यातील बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.भरत पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बोराडी गावात एका पत्र्याच्या घरात विजय धुडकू बडगुजर (वय ४९) रा.बन्सीलाल नगर, वरझडी रोड, शिरपूर हा अँलोपँथिक औषधोपचार करण्याचा परवाना नसतांना तसेच मेडिकल्स कॉंन्सील आँफ इंडिया कडील रजिस्टे्रशन परवाना नसतांना रुग्णांवर अँलोपँथिक औषधोपचार करतांना सापडला, त्याच्याकडून औषधाचा साठा सुध्दा जप्त करण्यात आला आहे. तसेच बोराडी गावातील ग्रामपंचायत चौकात एका घरात भगवान कांतीलाल बडगुजर हा सुध्दा बोगस डॉक्टर बनून लोकांवर उपचार करीत असतांना आढळला, त्याच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान बडगुजर मात्र फरार झाला आहे. तसेच शिरपूर तालुक्यातील उमर्दा गावात बंगाली डॉक्टर असल्याचे सांगत लोकांवर विना परवाना उपचार करणार्या मंगल शुभम हिरा, सुबल हिरा या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर सुध्दा छापा टाकला गेला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात पंचायत समिती वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगल हिरा रा. २४ परगाणा, पश्चिम बंगाल, ह.मु. कनिलालल रामदास गुलवाणे रा.उर्मदा ता.शिरपूर याच्या राहत्या घरी, विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून अँलोपँथिक औषधाचा साठा कब्जात बाळगतांना मिळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 Comments