अमळनेर- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापाडी संघटनेच्या अध्यक्षपदी ताडेपुरा येथील श्री. रमेश बुधा धनगर उर्फ रमेश देव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीसंबंधी संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या सहीचे नियुक्तीचे पत्र नुकतेच रमेश धनगर यांना प्राप्त झालं आहे. रमेश धनगर हे हमाल मापाडी-संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे सुद्धा सदस्य आहेत. ते हमाल व मापाडी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर व प्रयत्नशील असतात. त्यांच्या या निवडीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रीय हमाल व मापाडी कामगार युनियनचे इतर पदाधिकारी सर्वश्री अभिमन भोई, लक्ष्मण पाटील, रमेश पाटील, धनराज पाटील, निंबा पाटील, गोकुळ पाटील, योगेश पाटील, बापू भोई, राजेंद्र पाटील, दंगल पाटील, वसंत पाटील, महादु पाटील, भगवान कोळी, मणिलाल भोई, अरुण भोई यांनी जल्लोष करून श्री रमेश देव धनगर यांचं अभिनंदन व कौतुक केलं आहे. अमळनेर तालुका हमाल मापाडी संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश देव धनगर यांची सुयोग्य निवडीबद्दल अमळनेर तालुका धनगर समाज बांधव व राज्य मल्हारराव होळकर प्रतिष्ठान तर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला यावेळी राजे मल्हारराव होळकर अध्यक्ष व काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत, न.पा. शिक्षण मंडळ सभापती आबासाहेब नितीन निळे, राजे मल्हार राव प्रतिष्ठानचे सचिव एस. सी. तेले सर, धनगर महासंघाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्रआबा लांडगे, निंभोरे येथील माजी उपसरपंच समाधान भाऊ धनगर, क्रांती मौर्य संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाट, शेतकी संघाचे संचालक सुधाकर आबा पवार, धानोरे येथील सरपंच दिलीप ठाकरे, प्रा. डॉ. विजय शिरसाठ, नाना धनगर, मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नानासाहेब प्रभाकर लांडगे, कृषी ॲग्रो संचालक प्रदीपभाऊ कंखरे, प्रा. दिनेश भलकार, प्रा. गजानन धनगर, मनोज रत्नपारखी, प्रा. आर.पी. धनगर, आनंदा हडप सर, आदी समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments