Header Ads Widget

*दोघी नेत्यांच्या एकाच दिवशी वाढदिवस व कै. धर्मा पाटील ते घरकुल प्रकरणमुळे अनेक कार्यकर्त्यांना कोणत्या नेत्यांकडे जाऊन निष्ठेची पोळी शेकायची चिंता....*

*वाढदिवसाच्या बँनर बाजीवरून मावळत्या संध्येला माहित पडेल की,नेता मोठा की-कार्यकर्त्यांची निष्ठा मोठी....*

*नगरपालीका निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनाही भावी उमेदवार व निष्ठावंत-लाभार्थी-विश्वासू कार्यकर्ता चाचपडण्याची संधी....*


*पोलीस प्रशासनालाही महासंकट,सरकार-कलेक्टर साहेबांचे करोना नियम पाळायचे का?गर्दीवाले कार्यक्रम होऊ द्यायचे....*

*जनमत-*

*दोंडाईचा-* आज १६ जानेवारी रविवार रोजी दोंडाईचा सारख्या लहानशा शहरात दोन मातब्बर-एकमेकांचे कट्टर व दोघी माजी मंत्री असलेल्या माणसांचा वाढदिवस वरील एकाच दिवशी सार्वजनिक स्वरूपात नगरपालीका निवडणुकीच्या तोंडावर साजरा होत आहे. पण हा वर्षे-पाच वर्षातुन साजरा होणारा वाढदिवस नुसता त्यांचा नसुन त्यांनी आपल्या राजकीय-सामाजिक जीवनात सर्वसामान्य-अडचणीत सापडलेल्या-त्रासलेल्या व अज्ञानी लोकांच्या जीवनात ज्ञानाची किती भर घालत.जनतेने आपल्याला दिलेल्या, अनमोल मतदान करून ज्या जनताभिमुख पदव्या जसे मंत्री-आमदार-नगराध्यक्ष- नगरपालीका सुपूर्द करून त्या कार्यकाळात पदाला किती योग्य न्याय दिला व गावाच्या-मतदार संघाच्या विकासात काय काय मर्क्युरी लाईट-हायमास्ट दिवे लावून. शहराच्या विकासात भर घातली.यावरून सर्वसामान्य जनतेच्या मनात चेतना निर्माण करत. विश्वासू-निष्ठावंत-लाभार्थी- पक्ष व नेता प्रतिमा प्रेमी कार्यकर्ते तयार होत. जनता यांना आपला नेता-मार्गदर्शक-सुख-दु:खातला मसीहा- भाऊसाहेब-नानासाहेब-दादासाहेब- आबासाहेब- बापूसाहेब मानते व अशी वेगवेगळी मंडळी वाढदिवसाच्या दिवशी स्व-खर्चातुन दिवसभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत. गावात व आता खासकरून वाटसप-फेसबुक-ट्विटर- इन्ट्राग्राम आदी मिडीया जगतात बँनरबाजी-व्हिडीओ बनवत कशी धुम-छबी-छाप आपल्या लाडक्या नेत्याची जनतेत निर्माण करते.यावर नेता मोठा होत असुन,कार्यकर्त्यांची मोठी निष्ठाही पणाला लागलेली असते.म्हणून यावर्षी तर गावात सार्वत्रिक नगरपालीका निवडणुक तोंडावर असल्यामुळे कोणता कार्यकर्ता कशी आपल्या नेत्याची वा-वा; हाजी-हाजी करत प्रसिद्धी देतो. यावर त्यांचे उमेदवारीचे भविष्य ते स्वतः घडवणार असुन नेत्यानांही भावी उमेदवार-निष्ठावंत-लाभार्थी व विश्वासू कार्यकर्ता पाच वर्षात कोणकोण शिल्लक आहे हे चाचपडण्याची साधी-सोपी संधी स्वतः च्या वाढदिवसमुळे चालून आली आहे.

आता म्हणुन मागील पाच वर्षात म्हणजे कै.धर्मा पाटील प्रकरणपासुन ते बालिका अत्याचार-घरकुल भष्ट्राचार प्रकरण पर्यत लाभार्थी-निष्ठावंत-विश्वासू कार्यकर्ते पक्ष व नेता बदलत. सर्व इकडे तिकडे होऊन गेले आहेत. म्हणून यावर्षी त्यानांही संकट आले आहे की,कोणता नेता चांगला-कोणता नेतावर अन्याय झाला व कोणता नेता आपल्या सुखदुःखात उभा राहतो व आपण कोणत्या नेत्याच्या सुखदुःखात उभे राहिलो व ह्या वाढदिवशी कोणत्या नेत्यापुढे हार-तुरे-जीव पुढे काढत. प्रामाणिकपणा-निष्ठेची पोळी शेकून उमेदवारी-नोकरी-कान्ट्रँक-कामे मिळवून घ्यायची चिंता पडलेली आहे.

म्हणून अशा ह्या द्विविधामय परिस्थितीत जनताही ह्या मनोरंजनमय वाढदिवसाला कोणता कार्यकर्ता कुठे जातो व कोणता नेता त्या निष्ठावंत-लाभार्थी-विश्वासू व वेळ पाहून गिरगिटसारखे रंग बदलणाऱ्या लबाड कार्यकर्त्याला पाठीशी घालते. याचा आनंद फ्री-मध्ये लुटणार आहेत.

मात्र ह्या सर्व परिस्थितीवर स्थानिक पोलीस प्रशासनालाही महासंकट निर्माण झाले असुन, त्यांनी करोना-ओमीक्रोण परिस्थितीवर सरकार-कलेक्टर यांचे नवीन गाईडलाईन नुसार गर्दी कमी करायचे नियम पाळायचे का? गर्दीवाले कार्यक्रम  गावात संपन्न होऊ द्यायचे. यावर जनतेचा मनोरंजन वजा वाढदिवसाचा खेळ अवलंबून आहे. नाहीतर असे रोज पोलीस प्रशासन गावात दिवसा पाच लोक एकत्र यायला जमाव-बंदी व रात्री संचार-बंदीचा नियम जनतेला पाळायला लावत आहे. आता पुढाऱ्यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला कैची लावते का?गर्दी होऊ देते. हे जनतेला पुढील काळात नियम पाळायला लक्षात येईल,असे गावातील सर्वसामान्य जागरूक जनता वाढदिवसाच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून मनातल्या मनात म्हणत आहे.

Post a Comment

0 Comments