Header Ads Widget

खान्देश शाहीर कलावंत वारकरी युवा मंडळ यांच्या वतीने आशापुरी माता मंदिराच्या सभागृहात बैठक



पाटण---आज दिनांक 06/01/2022 रोजी खान्देश शाहीर कलावंत वारकरी युवा मंडळ यांच्या वतीने आशापुरी माता मंदिराच्या सभागृहात बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये एक मताने ठराव सहमत करण्यात आला सभेचे अध्यक्ष ह.भ.प अनिल जगताप यांनी केलेल्या उदघोषणे मध्ये शिंदखेडा तालुका युवा कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यामध्ये विशाल भाऊ माळी (कुरुकवाडे)यांची खान्देश शाहीर कलावंत वारकरी युवा मंडळ शिंदखेडा तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सचिवपदी योगेश बागुल (चांदगड) यांची निवड करण्यात आली सर्वांच्या सहमतीने ठराव एक मताने मंजूर करण्यात आला
     या प्रसंगी श्री. अनिलजी जगताप (प्रदेश अध्यक्ष) श्री.पांडुरंग माळी(जिल्हा अध्यक्ष)
श्री. गिरीष देसले (भडणे सरपंच) श्री.खेमराज पवार(तालुका अध्यक्ष) श्री.हरिभाऊ ठाकरे( उपध्यक्ष) मनोहर पवार (तालुका उपअध्यक्ष) राजेंद्र पवार (सचिव) इ.पदाधिकारी उपस्थित होते.
     यावेळी महिला वारकरी सरलाताई भोई (कार्याअसध्यक्ष) रत्नाबाई गुरव(संघटक) मंगलाबाई माळी (सदस्या) व आदी महिला पदअधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments