धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दुपारी दोन वाजता काँग्रेस भवन येथे डिजिटल सदस्य नोंदणीबाबत जिल्ह्यातील नोंदणी अधिकाऱ्यांची तातडीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांनी डिजिटल सदस्य नोंदणी बाबत सविस्तर माहिती दिली. डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम अतिशय महत्त्वाची असून गावपातळीपर्यंत जाऊन प्रत्येक Booth व जाऊन प्रत्यक्ष सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे प्रत्येक सदस्याचा फोटो व मतदान कार्ड नोंदणी करिता आवश्यक राहणार आहे, तसेच प्रत्येक सदस्याला पाच रुपये फी त्याकरिता द्यावी लागणार आहे.
धुळे जिल्ह्यातील 56 जिल्हा परिषद गट व साक्री शिंदखेडा दोंडाईचा व शिरपूर नगरपरिषद क्षेत्रातील साठ नोंदणी अधिकारी आज बैठकीला उपस्थित होते. आता प्रत्येक Booth वाईज नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात येईल व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुथ नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न होईल, त्यांनाच याठिकाणी प्रशिक्षित करण्यात येईल मग नंतर डिजिटल सदस्य नोंदणी अभियान गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहे. डिजिटल सदस्य अभियान नोंदणी अंतर्गत महिलांचाही समावेश असणार आहे Booth नोंदणी अधिकारी म्हणून प्रत्येक बुथवर एक महिला त्यात असणार आहेत.
जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात येईल याकरिता आज जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हा नोंदणी अधिकाऱ्यांच्या चे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते , यावेळी भानुदास गांगुर्डे के डी पाटील रितेश पाटील अरुण पाटील दत्ता भाऊ परदेशी भानुदास माळी राजेंद्र देवरे प्रकाश पाटील, प्रकाश राव पाटील( OSD ) उपस्थित होते

0 Comments