शिरपूर - तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना पदाधिकाऱ्यांचा सत्कार किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव तथा ग. स. बँकेच्या लोकमान्य पॅनल प्रमुख, शिक्षकनेते, मान. नानासाहेब निशांतजी रंधे यांच्या शुभहस्ते पार पडला.
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष प्रा. राकेश देविदास चौधरी, उपाध्यक्ष प्रा. प्रशांत गजानन पाटील, सल्लागार प्रा. जी. व्ही. वाडीले, जिल्हा
कार्यकारणी प्रा. दीपक भामरे, सहसचिव प्रा.अनिल पाटील आणि प्रसिद्धीप्रमुख म्हणून प्रा. जगतसिंग पाटील यांची निवड झाली. या सर्वांचा सत्कार किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात सचिव, मा. नानासाहेब निशांतजी रंधे यांनी केला.
धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, मा. भाऊसाहेब नामदार डॉ. तुषारजी रंधे, संस्थेच्या खजिनदार मा. आईसाो. आशाताईजी रंधे, धुळे जिल्हा बँक संचालिका, ताईसाो. सिमाताईजी रंधे, भाजपा नेते, आबासाो. राहूलजी रंधे, कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका तथा साहित्यिका, ताईसाो. सारिकाताईजी रंधे, विश्वस्त तथा नगरसेवक, बाबासाो. रोहितजी रंधे, ग. स. बँक संचालक, तात्यासाो. शशांकजी रंधे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन आनंद व्यक्त केला आणि पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक अण्णासाो. आनंदराव पाटील, बापूसाो. के. डी. बच्छाव, दादासाो. सिताराम माळी भाऊसाहेब आणि भैय्यासाो. बी. आर. माळी हे उपस्थित होते.



0 Comments