बीड या गावाला एेतिहासिक संदर्भ आहे. हे गाव बाराव्या शतकात शिलाहाराच्या राजधानीचे गाव होते अशी इतिहासात नोंद आहे. शिलाहार राजाच्या राजधानीचं गाव 'बीड' या गावावर परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो अशी आख्यायिका आहे. खरतर शिलाहार राजाच्या काळात 'बीड' या गावात सोन्याची नाणी काढली जात होती. या नाण्यांवर मुद्राही उमटवली जात होती. ही नाणी डाळीच्या आकाराची होती. आजतागायत ग्रामस्थांना सापडलेल्या नाण्यांमध्ये खूप नाणी ही डाळीच्या आकाराचीच आहेत. बीडमध्ये बहुतेक घरांत एक-दोन स्वरुपात ही नाणी आपल्याला पाहायला मिळतात.
चालू वर्षातील ही पहिलीच घटना आहे. नेमके यामागे काय शास्त्र आहे जाणून घेऊया.
होळीसाठी मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची विधिमंडळात माहिती
या गावात कल्लेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. सतीचे वाण दाखवणारी देशातली एकमेव वीरगळ याच मंदिर परिसरात आहेत. सतीच्या प्रथेचे दगडात कोरलेले प्रत्यक्ष चित्रण या शिलेवर आहे. मंदिर परिसरात १०० हून अधिक शिलालेख आणि विरशिळा आहे. त्यावर बाराव्या शतकातील अनेक मजकूर लिहिलेले आहेत.
कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करत आहे. सोमवारी (दि. १४) कसबा बीडच्या ग्रामस्थ मंगल सुनील बीडकर यांना श्री कल्लेश्वर मंदिर परिसरात शेतात भांगलन करताना त्रिशूळछाप सुवर्णमुद्रा सापडली. या सुवर्णमुद्रेला गावात 'बेडा' असे म्हणतात.

0 Comments