नंदुरबार - नंदूरबार शहरातील धुळे चौफुलीकडून गुजरात राज्यातील अहमदाबाद व वडोदरा येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा ५५३ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला आहे.तांदळाची वाहतूक करणाऱ्या दोन्ही ट्रकसह २८ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेकडो क्विंटल तांदूळाची धुळे चौफुली परिसरातून गुजरात राज्याकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहिती नुसार , असता तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक क्र . ( एमएच २३ एयू ५५५६ ) धुळे चौफुली जवळ आले सदरचे वाहन अडविण्यात आले .
वाहनाची तपासणी केली असता त्यात ५ लाख १३ हजार ३६५ रुपये किंमतीचे ५०० गोण्यां मध्ये २५० क्विंटल तांदूळ आढळून आला . सदरच्या गोण्यांवर काहीही लिहिलेले किंवा छापलेले दिसून आले नाही . दरम्यानवाहनातील दोघां कडून सादर करण्यात आलेली बिले हस्तलिखित व संशयास्पद असल्याने सदरचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे संशया वरुन वाहनासह जप्त करण्यात आला . तसेच ट्रक क्र . ( एमएच १६ एवाय ६४६७ ) हे वाहन अडवून तपासणी केली असता त्यात देखील ५०६ गोण्यांमध्ये ५ लाख २८ हजार ७७० रुपये किंमतीचा सुमारे २५३ क्विंटल तांदूळ आढळून आला . दरम्यान , वाहन चालक सुलेमान अजमखान याने सादर केलेली ई - वे बिलात नमूद वेळ व नंदुरबार साठी येण्याचा वेळ यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली . यामुळे सदरचा तांदूळ हा अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशया वरुन वाहनासह ताब्यात घेण्यात आला आहे . दोन्ही वाहनातील १०लाख ४२ हजार १३५ रुपयांचा ५५३ क्विंटल तांदूळ व १८ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे २८ लाख ४२ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . याबाबत तहसिल नंदुरबार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षद छगन नेरकर यांच्या फिर्यादी वरुन वाहन चालक दिलीप शिवाजी देंगे व नारायण चंद्रसिंग गाडे ( दोन्ही रा . मोहजवाडी ता . बीड ) व दुसऱ्या वाहनातील सुलेमान अजमखान ( रा . नवापूरा , औरंगाबाद ) या तिघा संशयितां विरोधात पोलीस शहर ठाण्यात नंदुरबार जीवनावश्यक वस्तू कायदा १ ९ ५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करत आहेत .
0 Comments