कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 7 मार्च रोजी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्हांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतरचे काही दिवस आणखीही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 मार्चनंतर पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पू.राजस्थान व प. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

0 Comments