शिंदखेडा: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून चौकशीसाठी त्यांना दि 13 मार्च रोजी सकाळी 11 वा बी.के.सी. पोलीस ठाणे, सायबर विभाग, बांद्रा (पूर्व) मुंबई येथे बोलाविण्यात आले होते. नंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्तेयांच्या दबाव लक्षात आल्यावर त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन चौकशी करण्यात येणार आहे .याचा निषेध म्हणून राज्य सरकारच्या या निकांनी कृत्याविरोधात नोटीसीचे दहन करुन महाविकास आघाडी सरकारचा तिव्र निषेध नोंदवून ,महाआघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देऊन शिंदखेडा तालुका भारतीय जनता पार्टी मा शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष नारायण भाऊसाहेब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कामराज जी निकम यांच्या नेतृत्वाखाली नोटिशीची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी धुळे जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस डीएस गिरासे शिंदखेडा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रा डॉ आर जी खैरनार पंचायत समितीचे सभापती भरत पवार उपसभापती बलवंत बोरसे जिल्हा परिषदेचे सदस्य पंकज कदम धनंजय मंगळे डी आर पाटील विरेंद्र सिंग गिरासे महावीर सिंग रावल सिद्धार्थ शिसोदे माजी पंचायत समितीचे सभापती जिजाबराव सोनवणे माजी उपसभापती नारायण सिंग दिवाण सिंग गिरासे माजी पंचायत समिती सदस्य दगाजी देवरे माजी सभापती भूषण दादा सरपंच साहेबराव पाटील सतारे चे सरपंच गोरख तात्या पंचायत समिती सदस्य दीपक मोरे रणजित गिरासे महाआघाडी सरकार विरोधात धिक्कार आंदोलन केले .यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments