Header Ads Widget

*शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून कृषी आणि सिंचन क्षेत्रासहीत सर्वसमावेशक अर्थसंकल्प*




शिंदखेडा---राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प काल राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडला. विकासाची पंचसूत्री देणारा हा अतिशय नीटनेटका अर्थसंकल्प आहे. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण व उद्योग या पाच दिशेने योग्य पावले उचलत हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तयार केलेला आहे.
महाराष्ट्र राज्य हे एक ट्रीलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलीय. यात विशेषतः शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कृषी आणि सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचे आढळून येते.

आपल्या धुळे जिल्ह्यासाठी संजीवनी असणाऱ्या सुलवाडे-जामफळ या महत्वाकांक्षी प्रकल्पाकरीता ₹ १८० कोटींची भरीव तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच खान्देशसाठी वरदान असणाऱ्या तापी नदीवर ३ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागासाठी तब्बल ₹ १३, २५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹ ५०,००० हजारांची मदत. २० लाख शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे.
कृषी क्षेत्र बळकट होण्याकरिता केलेल्या तरतुदी भरीव आहेत. यामध्ये खरीप हंगामात ० टक्के व्याजदराने कर्ज. यात ४३ लाख शेतकऱ्यांना ₹ ९११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेततळ्यांच्या अनुदान रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. महिला शेतकरी ३० टक्के तरतूद वाढवून ५० टक्के. कृषी विभागाला ₹ ३,५०० कोटींचा निधी. २०२२-२३ मध्ये ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भूविकास बँकेची ₹ ९६४ कोटींची कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्यात महिला रुग्णालय तसेच टेलिमेडीसिन रुग्णालय उभारले जाणार आहे.
धुळे जिल्ह्यात १०० खाटांचे महिला रुग्णालय उभारले जाणार.

एकंदरीत हा अर्थसंकल्प विकासाची पंचसूत्री सांगणारा व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणारा आहे.

*- संदीप बेडसे,*
*माजी जिल्हाध्यक्ष,*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे*


Post a Comment

0 Comments