*नगरपालीका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला....*
*जनमत-*
*दोंडाईचा-* राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नसतानाच,एकीकडे विरोध व महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रक्रिया पूर्ववत ठेवली आहे. म्हणून दोंडाईचा नगर पालिकेची प्रभाग रचना गुरुवार म्हणजे आज १० मार्च रोजी प्रसिध्द केली जाणार असल्याने पालिका निवडणुकीसाठी बिगुल वाजला, असे म्हणण्यास हरकत नाही आहे.
दोंडाईचा नगरपरिषदेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. सदर प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे खाली दर्शविलेल्या ठिकाणी दोंडाईचा नगरपरिषदेच्या क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी खुले ठेवण्यात आलेले आहेत.
१) मा.जिल्हाधिकारी,धुळे कार्यालयाचे नोटीस बोर्डवर २) दोंडाईचा नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर ३) दोंडाईचा नगरपरिषदेच्या क्षेत्रात खालील ठिकाणी अ) तलाठी कार्यालय शिंदखेडा-दोंडाईचा ४ ) जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांचे संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा दिनांक १०/०३/२०२२ गुरूवार पासुन हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी, ( हरकती व सुचना मुख्याधिकारी यांच्याकडे, निवडणूक कार्यालय अथवा संबधित प्रभाग निहाय गुरूवार दिनांक १७/०३/२०२२- दुपारी ३.०० वाजेपर्यंत कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करावेत.उपरोक्त तारखेनंतर मुख्याधिकारी दोंडाईचा नगरपालीका यांचेकडेस आलेले हरकत अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हरकती व सुचना दाखल करणाऱ्या नागरिकांनी सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

0 Comments