दिनांक-०९/०३/२०२२ बुधवार
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकताच २३वा,शालांत विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका श्रीमती भारती मॅडम ह्या होत्या.
वरील कार्यक्रमाचेअध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर इ.१०वीच्या विद्यार्थींनी आपलीशाळा, आपले शिक्षक व कर्मचारीवृंद इ.विषयी मनोभाव व्यक्त केलेत.
यानंतर विद्यालयातील शिक्षक-श्री.सी.जी.वारूडे,एस.बी.भदाणे,श्री.पी.आर.पाटील इ. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना थोर विचारवंत यांच्या संदेश माध्यामातून संबोधित करण्यात आले.
तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर)यांची ' कणा ' कविता,तर वि.दा.करंदीकर यांची ' घेता ' कविता व तुकाराम महाराज म्हणतात की,कन्या सासुरवाशी जाये, मागे परोतुनी पाहे।
कैसे झाले माझ्या जीवा,केव्हा भेटशील केशवा॥
इ.विषयी महत्त्व पटवून देत म्हणाले की,शाळा ही एक कुटुंब आहे; तर गुरू हा तीन प्रकारचा असतो.
१)अधिकार तसा उपदेश करणारा.
२)उपदेशाचा पाऊस पाडणारा.
३)मौनाने उपदेश करणारा.
तर व्यक्ती हा आजन्म विद्यार्थी असतो कारण शिक्षण हे माणसाला विचार देते.तर शिक्षण हे पवित्र आहे त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे इ.संदेशातून मनोभाव व्यक्त करत विद्यार्थ्यांना नोटा(चलन),नोट जर खराब /फाटकी असली तर चालते का? तर तुमच्या जीवनात चांगले आणि वाईट या गोष्टींचे आत्मपरीक्षण करत मोबाईलचा उपयोग आपल्या जीवनात चांगल्यासाठी वापर करावा तर जीवनात तुम्ही कितीही मोठे झालात आपल्या आईवडील व गुरू यांचा आदर करावा इ.विषयीचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार श्री.पी.आर.पाटील यांनी मानले,या कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-जे.डी.चव्हाण,एस.एस. पाटील,आर.बी.गवळे, के.एस.सनेर व शिक्षकेत्तर वृंद- जे.एस.कदम(भाऊसाहेब),एम.वाय.पाटील, डी.डी.कदम,पी.डी.खोंडे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments